Translate

Wednesday, 25 June 2025

नांदेड तहसील कार्यालय सायबर सिक्युरिटी अवेअर आणि हायजिन प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न!

 नांदेड तहसील कार्यालय सायबर सिक्युरिटी अवेअर आणि हायजिन प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न!


नांदेड, 1 एप्रिल 2025 – तहसील कार्यालय नांदेड येथे "Stay Safe Online / Cyber Hygiene" सायबर सुरक्षा जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी MyGov Campus Ambassador तथा महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अभियंत्यांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी श्री. संजय वारकड साहेब यांच्या हस्ते झाले. मास्टर ट्रेनर श्री. सलगर यांनी सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, डेटा सुरक्षा, ऑनलाईन फसवणूक आणि डिजिटल व्यवहारांसाठी आवश्यक उपाययोजना यावर महत्त्वपूर्ण माहिती दिली.
कार्यशाळेत Wi-Fi Security, Online Security, ATM Security, SIM Cloning, Aadhaar Payment Security, Cyber Bullying Protection यासारख्या विषयांवर सखोल चर्चा झाली.
कार्यक्रमात इंद्रजीत गरड (निवडणूक नायब तहसीलदार), स्वप्निल दिघलवार (निवासी नायब तहसीलदार), नितेशकुमार बोलेलू (नायब तहसीलदार निवडणूक), काशीनाथ डांगे (नायब तहसीलदार महसूल), रविंद्र राठोड (पुरवठा निरीक्षण अधिकारी) यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वामी मंडळ अधिकारी यांनी आभार प्रदर्शन केले, तसेच देविदास जाधव (अव्वल कारकून) यांनी सहकार्य केले.
तहसील कार्यालय नांदेड आता सायबर सिक्युरिटी अवेअर आणि सायबर हायजिन प्रमाणित कार्यालय बनले असून, हा उपक्रम सरकारी कार्यालयांसाठी आदर्श ठरेल.









No comments:

Post a Comment