नगरपरिषद कार्यालय औसा – सायबर सुरक्षा जागरूकता व AI प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न!
औसा, ९ एप्रिल २०२५:
नगरपरिषद कार्यालय औसा येथे "Stay Safe Online / Cyber Hygiene" या उपक्रमांतर्गत सायबर सुरक्षा जनजागृती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. मंगेश शिंदे (प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगरपरिषद औसा) यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी MyGov Campus Ambassador तसेच SDO औसा-रेणापूरचे अभियंता श्री. डी. बी. सलगर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
श्री. सलगर डी. बी. (मास्टर ट्रेनर) यांनी सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, डेटा सुरक्षा, डिजिटल व्यवहारांचे सुरक्षितता उपाय तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सरकारी कामकाजातील उपयोगाबाबत उपयुक्त माहिती दिली.
Wi-Fi सुरक्षा
ऑनलाईन व्यवहार सुरक्षितता
एटीएम सुरक्षेचे नियम
SIM क्लोनिंगपासून संरक्षण
आधार पेमेंट सिस्टममध्ये सुरक्षेची काळजी
सायबर बुलिंग प्रतिबंध
AI चा वापर प्रशासकीय कामकाजात
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मा. श्री. मंगेश शिंदे यांनी समाधान व्यक्त केले आणि सर्व सहभागी व सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. श्री. सौदागर यांचेही या कार्यक्रमातील मोलाच्या सहकार्याबद्दल विशेष उल्लेख करण्यात आला.
नगरपरिषद कार्यालय औसा आता सायबर सिक्युरिटी अवेअर आणि सायबर हायजिन प्रमाणित कार्यालय ठरले असून, हा उपक्रम इतर शासकीय कार्यालयांसाठी आदर्श मॉडेल ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
No comments:
Post a Comment