Translate

Wednesday, 25 June 2025

तहसील कार्यालय उमरगा येथे सायबर अवेअरनेस कार्यशाळा आणि 'सायबर सिक्युर वॉल'चे उद्घाटन संपन्न उमरगा

 तहसील कार्यालय उमरगा येथे सायबर अवेअरनेस कार्यशाळा आणि 'सायबर सिक्युर वॉल'चे उद्घाटन संपन्न उमरगा


दि. 29 मार्च 2025 – तहसील कार्यालय उमरगा येथे "Stay Safe Online" या उपक्रमांतर्गत सायबर सुरक्षा जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे मार्गदर्शन श्री. सलगर दीपक बाळासाहेब, नेटवर्क अभियंता, उपविभागीय कार्यालय औसा-रेणापूर यांनी केले.
कार्यशाळेमध्ये तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी, ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांना सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे करावे याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. श्री. सलगर यांनी सायबर सुरक्षिततेच्या मूलभूत संकल्पना, ऑनलाईन फसवणूक, डेटा सुरक्षा आणि डिजीटल व्यवहारांमध्ये घ्यावयाची काळजी यासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती उपस्थितांना दिली.


🚀 तहसील कार्यालय उमरगा येथे 'सायबर सिक्युर वॉल'चे उद्घाटन! 🔒
तंत्रज्ञानाच्या युगात सायबर सुरक्षा ही काळाची गरज बनली आहे. याच दृष्टीने G20 सायबर सिक्युर अवेअरनेस प्रोग्राम अंतर्गत ‘सायबर सिक्युर वॉल’ स्थापन करण्यात आली आहे.


ही वॉल QR Code बेस तंत्रज्ञानावर कार्यरत असून, नागरिकांना विविध सायबर सुरक्षेशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी मदत करेल.






💡 सुरक्षित इंटरनेट वापरासाठी उपलब्ध विषय:
✅ Wi-Fi Security
✅ Online Security
✅ ATM Security
✅ Cyber Security
✅ Data Security
✅ SIM Cloning
✅ Aadhaar Payment Security
✅ Browser Security
✅ Virus Security
✅ E-mail Security
✅ Cyber Bullying Protection
✅ Payment Security
✅ Spear Phishing Awareness
📌 QR कोड स्कॅन करून मिळवा महत्त्वाची माहिती आणि आपल्या सायबर सुरक्षेची काळजी घ्या!
सध्या वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर "Stay Safe Online" हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असून, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना डिजीटल सुरक्षा उपायांविषयी जागरूक करण्यासाठी ही कार्यशाळा महत्वपूर्ण ठरली.
कार्यशाळेनंतर उपस्थितांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
📌 – तहसील कार्यालय उमरगा, जि. धाराशिव

No comments:

Post a Comment